मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना : संपूर्ण माहिती

Table of Contents

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना: संपूर्ण माहिती

काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ?
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनाचा लाभ कोण घेऊ शकतो ?
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनासाठी अर्ज करण्यासाठी ची आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा ?
अर्ज केल्यानंतर पैसे केव्हा मिळेल?
लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र शासनाने खास महिलांसाठी सुरु केलेली योजना आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा करण्यात आली.

काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ?


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सुरु केली गेली आहे. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करणे, त्यांना सुधारित आरोग्य मिळावे आणि त्यांच्या पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली. कुटुंबातील महिलांच्या निर्णायक भूमिकेला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या योजने अंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये सरकारकडून प्रती महिना एक हजार पाचशे रुपये १५०० जमा केले जातील.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनाचा लाभ कोण घेऊ शकतो?


मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनाचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही पात्रता निकष जाहीर केले आहेत. यामध्ये-

  • लाभार्थी महिला ही राज्याची रहिवासी असावी.
  • लाभार्थी महिलेचे वय हे २१ ते ६५ या वयोमर्यादे मधेच असावे.
  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. जर कुटुंबात एक पेक्षा जास्त अविवाहित महिला असतील तर त्यातील एकाच महिलेला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनाचा लाभ घेता येऊ शकतो.
  • लाभार्थी महिलेचे स्वताचे बँक खाते असावे. ते बँक खात्याला आधारकार्ड लिंक केलेले असावे.
  • लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा (२.५० लाखापेक्षा ) जास्त नसावे.
  • लाभार्थी महिलेच्या कुटुंबात ट्रक्टर वगळता दुसरी कोणतीच चार चाकी गाडी नसावी.

वरील सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या महिला या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेऊ शकता.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनासाठी अर्ज करण्यासाठी ची आवश्यक कागदपत्रे


खाली दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थी या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज करू शकता.

  • आधार कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र / शाळेचा दाखला / १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / अधिवास प्रमाणपत्र / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र
  • रेशन कार्ड / उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक (आधार कार्ड लिंक केलेले असावे)
  • हमीपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?


मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करावा लागतो. यापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी “नारीशक्ती दूत ” हे मोबाईल एप सरकारने उपलब्ध करून दिले होते. परंतु आता त्या एप द्वारे अर्ज स्वीकारणे बंद केले आहे.

Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी आता सरकारने नवीन पोर्टल सुरु केले आहे.

https://ladakibahin.maharashtra.gov.in या लिंकद्वारे आता लाभार्थी सरळ अर्ज दाखल करू शकतो. अर्ज करण्यासाठी लाभार्थीला दिलेल्या लिंक वर क्लीक करावे. क्लीक केल्यावर एक पोर्टल ओपन होईल. त्या पोर्टलवर गेल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठीचा पर्याय निवडावा.

अर्ज केल्यानंतर पैसे केव्हा मिळेल?


मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरून झाल्यावर शेवटी तुम्हाला अर्ज भरल्याचा एक आयडी मिळेल. तो आयडी जपून ठेवावा. त्या आयडी ची एक प्रत (प्रिंट आउट) काढून अंगणवाडी सेविकडे जमा करावी. ऑनलाइन अर्ज जमा झाल्यावर सरकारडून त्याची तपासणी केली जाईल. तुम्ही अर्ज करताना भरलेली माहिती आणि दिलेले डॉक्यूमेंटची तपासणी केली जाईल. लाडकी बहिण योजना सुरु करण्याचा हेतू हाच आहे की, गरजू महिलांना आर्थिक सहायता करणे. त्यामुळे ज्या महिला दिलेल्या निकषांमध्ये बसणार नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जातील.

ज्या महिलांचे अर्ज लाडकी बहिण योजनेचे साठी मंजूर केले जातील त्यांना अर्ज भरल्यानंतर महिन्याभरात त्यांचे अनुदान एक हजार पाचशे (१५००) प्राप्त होऊ शकेल. या पात्र महिलांचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी ?


महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक विकासासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार कडून काही निकष लागू केले गेले आहेत. त्या निकषांच्या आधारे पात्र महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकता. या पात्र महिअलनच या योजनेचा लाभ घेता येईल. अन्यथा अपात्र ठरलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जातील.

लाडकी बहिण योजनेचा अर्ज करताना खालील गोष्टी आवश्य पाळाव्यात.

  • अर्ज भरण्याआधी पात्रतेचे निकष निट वाचून घ्यावे.
  • अर्ज भरताना खरी माहिती भरावी.
  • अर्ज भरताना बँकेचा खाते क्रमांक नित तपासून पाहावा.
  • बँक खाते हे अर्ज करणाऱ्या महिलेच्या नावावर असावे.
  • बँक खात्याला मोबईल नंबर आणि आधार लिंक असावे.
  • रेशन कार्ड ची पहिल्या आणि मागच्या पानाची फोटो प्रत जमा करावी.
  • बँक पासबुक च्या पहिल्या पानाची फोटो प्रत जमा करावी.

कोणत्या महिलांना या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाहीत ?


  • १. ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे, अशा महिलांना लाडकी बहिण योजना चा लाभ मिळणार नाही.
  • २.ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे, अशा महिलांना लाडकी बहिण योजना चा लाभ मिळणार नाही.
  • ३. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  • ४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, तर अशा महिलांना लाडकी बहिण योजना चा लाभ मिळणार नाही.
  • ५. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, तर अशा महिलांना लाडकी बहिण योजना चा लाभ मिळणार नाही.
  • ६. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत, तर अशा महिलांना लाडकी बहिण योजना चा लाभ मिळणार नाही.
  • ७. ज्या महिलांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, तर अशा महिलांना लाडकी बहिण योजना चा लाभ मिळणार नाही.

थोडक्यात पण महत्वाचे –


१. एकाच कुटुंबातील किती महिला या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेऊ शकतात?

एकाच कुटुंबातील दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

२. एकाच कुटुंबात एक पेक्षा जास्त अविवाहित मुली असतील तर सर्वाना या योजनेचा लाभ घेता येईल का?

एकाच कुटुंबातील एक पेक्षा जास्त अविवाहित मुली असतील तर त्यातील एकाच मुलीला या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

३. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न मर्यादा किती आहे?

ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा (२.५० लाखापेक्षा) कमी असेल त्याच कुटुंबातील महिलेला या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

४. लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेची वयोमर्यादा किती आहे ?

सुरुवातीला सरकारने या योजनेचा लाभार्थी महिलांची वयोमर्यादा ही २१ ते ६० अशी ठेवली होती. म्हणजेच लाभार्थी महिला ही किमान २१ ते कमाल ६० वयाची असावी. नंतर सरकारने या निकषामध्ये बदल करून ही वयोमर्यादा किमान २१ ते कमाल ६५ अशी केली आहे.

५. कुटुंबात कोणते वाहन असेल तर योजनेचा लाभ घेऊ शकतो ?

लाभार्थी महिलेकडे चार चाकी वाहन नसावे. ज्या महिलांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, तर अशा महिलांना लाडकी बहिण योजना चा लाभ मिळणार नाही.