जानेवारी ७ वा हफ्ता ची तारीख जाहीर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अनेक गरजू आणि होतकरू महिलांना झाला आहे. अनेक महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळाले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना |
जानेवारी ७ वा हफ्ता ची तारीख जाहीर |
कोणत्या तारखेला जमा होणार जानेवारीचा ७ वा हफ्ता ? |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे बाकी हफ्ते केव्हा मिळणार? |
कोणत्या महिलांना ७ वा हफ्ता मिळणार नाही? |
लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची तपासणी केली जाणार? |
लाडकी बहिण योजनेची माहिती |
अपात्र ठरलेल्या महिलांचे पुढे काय होणार? |
थोडक्यात अपडेट |
थोडक्यात पण महत्वाचे |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या योजनेच्या माध्यमातून सरकार लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० (एक हजार पाचशे रुपये) जमा करते. जुलै २०२४ साली या योजनेची सुरुवात करण्यात आली. या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार कडून काही निकष ठरवले आहे. ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील अशा पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा १५०० रुपये सरकार कडून जमा केले जातात.
जानेवारी ७ वा हफ्ता ची तारीख जाहीर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या योजनेच्या जानेवारी ७ वा हफ्ता ची तारीख जाहीर करून सरकारने महिलांना आनंदाची बातमी दिली आहेत. आता पर्यंत ६ हफ्त्याचे पैसे DBT द्वारे लाभार्थी महिलांच्या बैंक खात्यामध्ये जमा केले गेले आहेत.
कोणत्या तारखेला जमा होणार जानेवारीचा ७ वा हफ्ता ?
जानेवारीच्या २६ तारखेपर्यंत सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये १५०० रुपये जमा केले जातील असे सरकारने जाहीर केले आहेत. आतापर्यंत लाडकी बहिण योजना चे ६ हफ्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे बाकी हफ्ते केव्हा मिळणार?
ज्या पात्र महिलांनी अर्ज केले आहेत, परंतु त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत, एकही हफ्ता मिला नाही अशा पात्र महिलांच्या खात्यामध्ये या जानेवारी च्या ७ व्या हत्या सोबतच उर्वरित सर्व हफ्त्यांचे पैसे जमा होणार आहेत. या जानेवारी च्या हफ्त्यामध्ये काही लाभार्थी महिलांना ७५०० रुपये, काही महिलांना ३००० रुपये तर काही महिलांना १०००० हजार रुपये असे राहिलेल्या हफ्त्यानुसार पैसे दिले जाणार आहेत. आतापर्यंत एकही हफ्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये १०००० हजार (दहा हजार) रुपये जमा केले जाणार आहेत.
कोणत्या महिलांना ७ वा हफ्ता मिळणार नाही?
- १. ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे, अशा महिलांना लाडकी बहिण योजना चा ७ वा हफ्ता मिळणार नाही.
- २.ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे, अशा महिलांना लाडकी बहिण योजना चा ७ वा हफ्ता मिळणार नाही.
- ३. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
- ४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, तर अशा महिलांना लाडकी बहिण योजना चा ७ वा हफ्ता मिळणार नाही.
- ५. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, तर अशा महिलांना लाडकी बहिण योजना चा ७ वा हफ्ता मिळणार नाही.
- ६. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत, तर अशा महिलांना लाडकी बहिण योजना चा ७ वा हफ्ता मिळणार नाही.
- ७. ज्या महिलांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, तर अशा महिलांना लाडकी बहिण योजना चा ७ वा हफ्ता मिळणार नाही.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना: संपूर्ण माहिती
खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून जाणून घ्या, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना: संपूर्ण माहिती
https://knowhowinmarathi.com/mukhyamantri-ladaki-bahin-yojana
लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची तपासणी केली जाणार?
सरकारने महिलांना आर्थिक सहाय्यता देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली. या योजनेचा मुख्य हेतू हा गरजू आणि राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांना आर्थिक मदत करणे हा होता.
परंतु काही अपात्र महिला या योजनेचा फायदा घेत आहेत. या अपात्र महिलांनीही या योजनेसाठी अर्ज केले आहेत. हे सरकारच्या निदर्शनास आले आहेत. त्यामुळे आता सरकारने लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहेत. यामध्ये अपात्र असतानाही अर्ज केलेल्या आणि योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. त्यांना यापुढे या लाडकी बहिण योजने चा लाभ घेता येणार नाहीत.
तसेच ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केले गेलेले नसेल अशा महिलांना ही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
लाडकी बहिण योजनेची माहिती

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे आवश्यक कागदपत्र यादी
- आधार कार्ड
- जन्म प्रमाणपत्र / शाळेचा दाखला / १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / अधिवास प्रमाणपत्र / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र
- रेशन कार्ड / उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक (आधार कार्ड लिंक केलेले असावे)
- हमीपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
अपात्र ठरलेल्या महिलांचे पुढे काय होणार?
महिलांना आर्थिक सहायता देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने लाभार्थी महिलांसाठीची पात्रता यादी जाहीर केली होती. त्या पत्रात यादी नुसार महिलांना अर्ज करण्यास सांगितले गेले होते. पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मध्ये लाभ प्राप्त झाला. परंतु यात सरकारला असे आढळून आले की काही अपात्र असलेल्या महिलांनी देखील अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला आहेत.
लाडकी बहिण योजना मध्ये अपात्र असूनही महिला लाभ घेत आहेत अशा तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. त्यामुळे सरकारने आता लाडकी बहिण योजना मध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची तपासणी करायची ठरवली आहेत आणि आता यात अपात्र असलेले अर्ज या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना च्या लाभातून बाद केले जातील. अशा अपात्र अर्ज केलेल्या महिलांना यापुढे लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही.
mukhyamantri majhi ladaki bahin yojana mahiti
१. | योजनेच नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना |
२ | सुरुवात वर्ष | २०२४ |
३ | पात्र लाभार्थी | निराधार महिला आर्थिक मागासलेल्या महिला |
४ | मदत लाभ | १५०० रुपये प्रती महिना |
५ | योजनेची सुरुवात | १ जुलै २०२४ |
६ | अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
७ | योजनेचा हेतू | महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे |
थोडक्यात अपडेट
जानेवारीच्या २६ तारखेपर्यंत सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये १५०० रुपये जमा केले जातील. परंतु अपात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळणार नाही. तसेच ज्या पात्र महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत अशा सर्व महिलांना या जानेवारीच्या सातव्या हफ्त्यासोबातच उर्वरित हफात्याचे पैसे दिले जाऊ शकतात.
थोडक्यात पण महत्वाचे
१. जानेवारी ७ वा हफ्ता लाडकी बहिण योजनेचे पैसे केव्हा मिळणार ?
जानेवारी लाडकी बहिण योजनेचे ७ वा हफ्त्याचे पैसे २६ जानेवारी पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.
२. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मधील उर्वरित हफ्त्याचे पैसे केव्हा मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मधील उर्वरित हफ्त्याचे पैसे जानेवारीत मिळणाऱ्या सातव्या हफ्त्यासोबातच दिले जाऊ शकतात.
३. लाडकी बहिण योजना मध्ये काही फेरबदल केले गेले का?
सरकारने अर्जांची छाननी करून अपात्र अर्ज बाद करायचे ठरावले आहेत. त्यानुसार सरकारने ५ निकष जाहीर केले आहेत. या ५ निकषांच्या आधारावरच केलेल्या अर्जांची फेर तपासनी केली जाणार आहेत.
४. लाडकी बहिण योजना अर्जांच्या तपासणी मध्ये निकषांच्या आधारावर अपात्र ठरलेल्या अर्जांच पुढे काय होणार?
लाडकी बहिण योजना अर्जांच्या तपासणी मध्ये निकषांच्या आधारावर अपात्र ठरलेले अर्ज बाद केले जातील. त्यांना यापुढे या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणार नाही.
५. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न मर्यादा किती आहे?
ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा (२.५० लाखापेक्षा) कमी असेल त्याच कुटुंबातील महिलेला या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
६. लाडकी बहिण योजनेची ऑफिसिअल वेबसाईट कोणती आहेत?
लाडकी बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट
७. महाराष्ट्र माझी लाडकी बहिणी योजनेचे पोर्टल कोणते आहे.
महाराष्ट्र लाडकी बहिणी योजनेचे पोर्टल नारीदूत एप आहेत.
८. आतापर्यंत महाराष्ट्र माझी लाडकी बहिणी योजनेचे किती हफ्ते दिले गेले आहेत?
आतापर्यंत महाराष्ट्र माझी लाडकी बहिणी योजनेचे सहा हफ्ते दिले गेले आहेत?
९. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा सातवा हफ्ता कसा मिळेल?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा सातवा हफ्ता DBT द्वारे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल.